माया

Started by शिवाजी सांगळे, November 21, 2015, 09:18:01 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

माया

"माये"त का गुंतते माया?
सोडते धरीले हात हाती!

विसरूनी सारी नाती गोती,
का माणसे स्वार्थी होती?

दिले घेतले जाईल संपुन
कठोर सत्य असे जगती!

क्षणिक असे जीवन पसारा
उरतो शुन्य पोकळ अंती!

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९