तू वेगळी

Started by @गोविंदराज@, November 21, 2015, 10:47:50 AM

Previous topic - Next topic

@गोविंदराज@

मी आगळा, तू वेगळी..
मी पाषाणी तर तू जळी..

हसण्यातून अलिप्त झाली कशी?
गालावर पडलेली तू खळी...

तुझ निभावून गेल सगळ..
मी मात्र प्रेमाचा बळी...

उध्वस्त करून गेलीस आयुष्य...
कस म्हणव तुला खूळी...

तू आलीस यौवनाचे भ्रमण करुनी..
मी उभा अजुनी त्याच स्थळी...

काटे म्हणुनी, मला बाजूला सारुनी...
तू ठरसील एखाद्याची पाकळी,,,

                  @गोविंदराज@