बाजीराव - मस्तानी

Started by कवी-गणेश साळुंखे, November 22, 2015, 05:48:33 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

सध्या बाजीराव- मस्तानी चिञपटावर खुपच वाद-विवाद होत आहेत कारण एक तर त्या संजय लीला भंसाली चे डोक ठिकाणावर नाहीए आणि दूसरे ते सेंसार बोर्ड की ज्यांनी हा चिञपट पास करुन स्वताच्या बुध्दि ची लक्तरे वेशीवर तर टांगलीच परंतु सोबतीला मराठ्यांच्या इतिहासाची चुकीची माहिती लोकांसमोर आणायला त्या भंसाली ला परवानगी दिली....
आजकालच्या या दिग्दर्शकांना फक्त पैसा कसा कमवता येईल याचीच पडलेली असते त्यासाठी मग ते काहीही दाखवतील कुणालाही हिरो अन कुणालाही विलन बनवुन टाकतील ज्यांना इतिहास माहिती आहे त्यांचे ठिक आहे पण ज्या तरुणांना माहिती नाही त्यांच्या मनात नको त्या गोष्टी भरुन टाकतील कारण या लोकांना चांगलेच ठाऊक असते की जितका जास्त वाद होईल तितकी जास्त पब्लिसिटी होईल त्यांच्या चिञपटाची आणि टिका करणारेही गुपचुप चिञपट बघुन येतील आणि मग त्यांनी दाखवलेले असत्य ही सत्य मानुन घेतील कारण कारवाई तर काहीच होणार नाही हीच तर मोठी शोकांतिका आहे आपल्या इतिहासाची आणि आपल्या मानसिक प्रवृत्ति ची आपण पराक्रमापेक्षा प्रेमप्रकरणे,लफडे मग ते खरे असो की खोटे तेच चवीने वाचणार लक्षात ठेवणार वीर योध्द्यांच्या नामोल्लेख एकेरी करणार त्यांच्यावर जोक्स बनवुन फेसबुक व्हाट्स अप वर पाठवणार मग खरे गुन्हेगार कोण हा प्रश्न मनाला पडतो ज्यांनी तो बाजीराव- मस्तानी चिञपट बनवला तो की ज्यांनी तो चिञपट बघितला ते.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938

MK ADMIN