कार्तिकी

Started by शिवाजी सांगळे, November 22, 2015, 09:55:40 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

कार्तिकी

कार्तिकीचा मेळा
भक्तांचा सोहळा ।
विठ्ठल सावळा
दर्शनास ।।

आनंदा उधाण
लोटले हे जन ।
सावळे ते ध्यान
पाहण्यास ।।

आषाढीची वारी
थोर समाधान ।
माऊली दर्शन
कार्तिकीस ।।


© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९