* तरुणाई *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 22, 2015, 01:44:48 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे


हरवली आहे आजची तरुणाई
गुफटली आहे फेसबुकच्या जाळ्यात
विसरुन खरी-खुरी परिवर्तनाची लढाई
अडकली आहे व्हाट्स अपच्या नादात

कुठे गेले वाडवडिलांचे संस्कार
विसरुन गेले का संस्कृति पार
नको त्या विकृतीला बळी पडुन
कसे करतात हे सामुहिक बलात्कार

प्रेमभंगात रडणारे मरणारे हे
काय दिव्य करुन दाखवतील
फक्त सोशल साइट्स वरतीच
आपल रडगाणं गात राहतील

शोधतोय मी त्या तरुणाईला
जी पेटुन उठेल अन्यायाला
दाखवुन देईल सा-या जगाला
करु देणार नाही अन्याय कुणाला.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938