निवडणुक

Started by शिवाजी सांगळे, November 23, 2015, 12:59:32 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

निवडणुक

उंदराच्या शेपटास
बांधला एकदा डबा
गावभर सांगत सुटला
रहिलो बघा मी
निवडणुकीला उभा !

जिंकला उंदिर एकदाचा
शेजा-यांच्या घरी
पार्टीसाठी कुरतडण्या
सामान त्यांच सारं
बोलावली त्याने
सगळ्या उंदरांची सभा !

बाजुच्या गल्लीत
निवडुन आला बोका
केला हुकुम त्यानं
सा-या उंदराना ठोका
चंगळ झाली बोक्यांची
आला मेजवाणीचा मोका !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९