वेड मन

Started by amkunjir, November 23, 2015, 01:09:07 PM

Previous topic - Next topic

amkunjir

मन हे वेड कधीही शांत नसत
ते नेहमी विचारामध्ये रमलेल असत
सगळ मनासारख झाल
तर ते अानंदात नाचत..
कारण मन हे लहान मुलासारखच असत |

जेव्हा एखाद्या गोष्टीचा राग येतो
तेव्हा मन सुद्दा रुसून बसत
कितीही समजवल मनाला
तरी ते समजण्या पलीकडे जात..
कारण मन हे लहान मुलासारखच असत |

अापला राग शांत करण्यासाठी
मन अापल्या माणसांवरच रागवतं
कारण मनालाही माहित असत
फक्त तेच माणूस समजुन घेउ शकत..
कारण मन हे लहान मुलासारखच असत |

एकदा मन शांत झाल
सगळ विसरुन चोहिकडे दवडत
सुखद अाठवणींच्या बागेमध्ये
मंञमुग्ध होउन बागडत..
कारण मन हे लहान मुलासारखच असत |

प्रेम व्यक्त करायच नसत
तर ते अनुभवायच असत
सांगता येत नसेल मनाला जरी
तरी ते अापल्या माणसांवर खूप प्रेम करत..
कारण मन हे लहान मुलासारखच असत |

अमित कुंजिर
९७३०६६७१९६