अशीच उभी..

Started by Nitin Bagde, November 23, 2015, 06:49:38 PM

Previous topic - Next topic

Nitin Bagde

अशीच उभी आहे मी,
दूर काहीतरी पाहत...
तुझ्या येण्याच्या वाटेवर,
एक टक नजर लावत...

मी दिलेली हाक आता,
तुझवर का पोहोचत नाही...
नजरेस तुझा दूरावा,
खरच मला पाहवत नाही...

का असा तु आज एकाकी,
माझ्या सोबत अबोल झालास..
सोबतीच्या वाटेवर मला,
का एकटीला ठेवुन गेलास...

तुझी वाट पाहील मी,
तु परत येई पर्यंत....
उठलेल तुफान मग,
तेव्हाच होईल शांत..

एक नजर तू बघ,
मी आयुष्यभर जगेल...
तुझ्या येण्याच्या आशेवर,
आयुष्यभर तुझी वाट बघेल...
   
                                           मनस्पंदन...
                                              नितिन...