का कुणाला फसवावस म्हणतोय?

Started by @गोविंदराज@, November 24, 2015, 10:46:43 AM

Previous topic - Next topic

@गोविंदराज@

मी हि आता तुझ्यासारखं जगावस म्हणतोय..
पुन्हा कुणाच्या तरी प्रेमात पडावस म्हणतोय..
खर प्रेम खरच असत का ?
मिळेपर्यंत त्याला शोधावस म्हणतोय...

आता मी हि तुला विसरावस म्हणतोय..
कुणाच्या तरी बाहुपाशात विसावस म्हणतोय..
पण दुसऱ्याच्या मिठीत ते पाहिलं सुख मिळत का ?
हा प्रश्न फक्त तुलाच विचारावस म्हणतोय...

नव्याने पुन्हा पाऊल टाकावस म्हणतोय...
स्वप्नाच नवीन घरट बांधावस  म्हणतोय..
तू करतेस जसा सुखाने संसार...
मी हि अगदी तसच कुणालातरी नांदवावस म्हणतोय..

तेच जून गाण नव्याने कुणासोबत तरी गावस म्हणतोय...
तुझ्यासारखंच लबाडीने मी हि जगावस म्हणतोय..
मी हि स्वीकारलं असत इतर कुणाला माझ्या आयुष्यात...
पण तुझ्या दग्यामुळे का कुणाला मी फसवावस म्हणतोय..

.........@गोविंदराज@