शब्दवेडा

Started by आशिष वाघमारे, November 24, 2015, 11:34:58 AM

Previous topic - Next topic

आशिष वाघमारे

ती म्हणजे शब्द
शब्द म्हणजे मी
मी म्हणजे वेडा
आणि
वेडा म्हणजेच ती.....।
आयुष्यात नाय ती
म्हणून केल्या कविता मी
शब्दांनाही वाचा फूटत नव्हती
जेव्हा नव्हती कवितेत ती.....।
येईल का आयुष्यात ती
कल्पितो कवितेत मी
तिचिच देणगी समजून
तीलाच लिहिन कवितेत मी.....।

आशिष...