"मी मलाच शोधत असतो"

Started by @गोविंदराज@, November 24, 2015, 04:23:26 PM

Previous topic - Next topic

@गोविंदराज@

आजही तू नटून थटून तयार होत असशील
पण तुला पाहणारा आता मी नसतो..
आजही तुझ्या गालावर खळी पडत असेल..
पण तुला हसवणारा मी नसतो..

आजही तुझे नखरे तसेच असतील
पण ते सहन करायला मी नसतो..
आजही तू रुसत असशील..
पण तुझा रुसवा काढायला मी नसतो..

आजही तुझ्या डोळ्यात स्वप्न असतील...
पण त्या स्वन्पात आता मी नसतो..
आजही तुझ मन हळवंच असेल..
पण त्या मनात आता मी नसतो..


पण तू तरी खरच सुखी आहेस का?
मी  मलाच विचारत असतो..
तू गेलीस आयुष्यातून आणि...
आणि तेव्हापासून मी मलाच शोधत असतो..
......@गोविंदराज@