"थोडस चुकलंच गणित प्रेमाचं"

Started by @गोविंदराज@, November 24, 2015, 04:44:46 PM

Previous topic - Next topic

@गोविंदराज@

थोडस चुकलंच गणित प्रेमाचं ..
अस तुलाही वाटतच असेल..

एकटी असतेस तेव्हाच सही..
माझी आठवण तुलाही येतच असेल...
त्या आठवणीचा थवा क्षण भर सही..
जुन्या त्या आभाळात तुला नेतच असेल...
थोडस चुकलंच गणित प्रेमाचं......................

पाण्यात असूनही तहानलेली तुझी काया..
माझच प्रेम तेव्हा तुला हव हवस वाटत असेल..
डोळ्यात तेव्हा आपसूकच
अश्रूंचा पूर नकळत दाटत असेल...
थोडस चुकलंच गणित प्रेमाचं......................

सगळी सुख असून हि पायाशी
तेव्हा तुला खूप एकट एकट वाटत असेल..
पुन्हा ते माझ्या सोबतचे क्षण येतील का?
विचारांची एक झुळूक मनाला झोंबून जात असेल...
थोडस चुकलंच गणित प्रेमाचं......................

मला भलेही तू अंधारात ठेवलं...
पण जे झाल ते तुझ्या मर्जीने झाल हे तुला तरी बोचतच असेल..
हाती फक्त निराशाच पडली...
मन तुझ तुलाच खात असेल...
थोडस चुकलंच गणित प्रेमाचं......................

............@गोविंदराज@