याचेच प्रेम असेही नाव .......

Started by विजय वाठोरे सरसमकर, November 26, 2015, 06:37:54 PM

Previous topic - Next topic

विजय वाठोरे सरसमकर



   याचेच प्रेम असेही नाव .......

कुणी असतो कुणाचा मितवा
तर कुणी मनतो याला गेरुवा
कुणी संबोधतो याला प्रितीच गाव
याचेच प्रेम असेही नाव
याचेच प्रेम असेही नाव ..........

कुणाला भासतो हा मावा
तर कुणाला मधाचा गोडवा
म्हणूनच सारे फसतात डाव 
याचेच प्रेम असेही नाव ..........

कुणी जातो प्रेमाच्या गावा
त्यांना लागतो प्रेम कर भरावा
कुणी सहतो तलवारीचे घाव
याचेच प्रेम असेही नाव ..........

कुणी मनतो याला विश्वासाचा कावा 
जो कुणीही करेल त्याने अनुभवाने ठरवावा
शेअर बाजारापेक्षा जास्त याला भाव
याचेच प्रेम असेही नाव ..........


                            विजय वाठोरे सरसमकर (साहिल)
                                  9975593359
                                 दि :- 26/11/2015