का कुणावर एवढं प्रेम कराव....?

Started by आशिष वाघमारे, November 27, 2015, 10:03:36 AM

Previous topic - Next topic

आशिष वाघमारे

का कुणावर एवढं प्रेम कराव......

घेता घेता नाव तीच,
सार आयुष्यच सराव.
का कुणावर एवढं प्रेम कराव...?
की,जगण्या ऐवजी फक्त तिच्यावर मराव...

फार थोड़ उरलय आयुष्य,
अस्स सहज का कुणाच्या नावी कराव.
का कुणावर एवढं प्रेम कराव...?
की,देवाला सोडून फक्त तीलच स्मराव...

बोलायला तर सगळच सोप्प असत..हो,
पण कुणीतरी करून दाखवाव
का कुणावर एवढं प्रेम कराव...?
की,ओठांऐवेजी काळजात फक्त प्रेमच आसव...

जगण्या,मरण्याच्या खोट्या शपता
प्रेमात अस्स नसायला हव
का कुणावर एवढं प्रेम कराव...?
की,साथीच्या आपेक्षेनेच जगाव

अवघड अश्या वाटेवर नेहमी
एकटच चालायला शिकाव
का कुणावर एवढं प्रेम कराव...?
की,सावली सारख कुणीतरी सोबत आसव

प्रेम नावाच्या घनदाट जाळ्यात
कस्स एवढ्या सहजासहजी फसाव
का कुणावर एवढं प्रेम कराव...?
की,फक्त तीच्याचसाठी एकांतात बसाव

का कुणावर एवढं प्रेम कराव.....?

आशिष वाघमारे
मो.9156075285