"हो! ते पण पटलय ना"

Started by @गोविंदराज@, November 27, 2015, 03:56:30 PM

Previous topic - Next topic

@गोविंदराज@

हो पटलय आज मनापासून,
सगळ काही उगीचच असत...
जे तुला जमल नाही,
म्हणतेस ते चुकीचच असत...

हो! ते पण पटलय ना,
वेगळ्याच आपल्या वाटा होत्या...
मी जन्मभरी कोरीत राहिलो,
तुझ्या मनावर कुठे माझ्या छटा होत्या...

हो! ते सुद्धा पटलय ना,
हे करतेस सगळ माझ्या भल्यासाठीच..
उथळ होत तुझ्या प्रितीच पाणी,
खळ खळाट मात्र भलत्या साठीच....

हो ! हो ! ते पण पटलय ना,
तुला अजूनही मी हवा हवासा वाटतो...
एवढे रूप बदलतेस तरी कसे?
सोबत फिरणारा चेहरा हि रोज नवा नवासा वाटतो...
....................@गोविंदराज@