स्वप्नवेडा .............

Started by विजय वाठोरे सरसमकर, November 28, 2015, 03:05:49 PM

Previous topic - Next topic

विजय वाठोरे सरसमकर



  :police:  स्वप्नवेडा  :police:

स्वप्नात माझ्या कुणीच नसत आजकाल
असते ती गारव्याने भारलेली संध्याकाळ
आणि त्या वेळी चमकणारी ती दिपमाळ
जुळवीत असते आपल्या भेटीची नाळ !!

स्वप्नातही स्वप्न पाहणारा मी स्वप्नवेडा
हरवून जात असतो तुझ्यातच थोडा
मग दिसतो तुला नि मला घेऊन उडणारा घोडा
आणि आपल्या दोघांचा तो चिरेबंदी वाडा !!

वाड्यातली आपली ती मखमली बाग
बागेतील फुलांना येणारी जाग
सुगंधी फुलांच्या धुंदीत नृत्य करणारा नाग
आणि गर्द पानांनी भरलेल उंच ते साग !!

स्वप्नातही एकच होतो वाद
तिथे तू असतेस की तुझ्या आठवनींची साद  :angel:
मग या आठवणींनाच देत असतो खाद
पण या सर्वात होता तुझाच अपवाद  !! :question:


                        विजय वाठोरे सरसमकर (साहिल)
                           9975593359
                          दि :- 28 -11 -2015