भेट

Started by Mahesh Redekar, November 28, 2015, 07:23:40 PM

Previous topic - Next topic

Mahesh Redekar

महेश रेडेकर

भेट

नजरेस तुझ्या भिड़ता नजर,
डोळे माझे पापण्यां मागे लपतात,
का हे होते असे,
का हृदयाचे ठोके चुकतात....?

भेट आपुली जरी नसे पहिली,
प्रत्येक भेटित जादू करतेस नविन,
हवा हवासा वाटनारा तो हाथांचा स्पर्श सोबतीने चालताना,
पण मनात मात्र भीती लोकांच्या ह्या नजरा कशा चुकविन...?

लोकांच्या त्या गर्दीत आपण मात्र असतो एकटे,
आणि जग उरते आपले त्या बाकावर,
बोलत तू ही नाही बोलत मीही नाही,
डोळे मात्र खुप बोलतात,
अशी ही सूंदर संध्याकाळ मग एकवटते चहा च्या त्या एकमेव कपावर...

मग वेळ येते दैनिक विरहाचि,
जेव्हा निरोप घेतो एकमेकांचा प्रेमाच्या त्या गल्लीत,
मनात असते तुझ्या माझे न जाने
पण ओठांवर येते "जा ना जा ना"
तुझ्या त्या प्रेमळ 'बाल' शैलीत....

असतो क्षण तो माझ्या ना पसंतीचा,
जेव्हा ऑनलाइन स्टेटस होतो लास्ट सीन,
अन प्रश्न पडतो,
कशी सरेल ही रात्र आत्ता तुझ्या विन...?

महेश रेडेकर
9967492782