प्रवास बळी

Started by शिवाजी सांगळे, November 29, 2015, 12:23:27 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

प्रवास बळी

स्पर्धेच्या उत्तरात उरे एकच प्रश्न
बसवावा मेळ कसा ईथे वेळेचा?
द्यायचा दोष कोणा? कुणी इथे?
गर्दीत येथे कुणी उरे ना कुणाचा!

सुटो म्हणता, सुटणार का प्रश्न ?
होईल अंत जीव घेण्या प्रवासाचा?
धावत्या रेसचे सारेच आम्ही घोडे
पुन्हाएक गेला पहा बळी गर्दिचा !

सुटतील सारे मात्र करूनी हळहळ
हरवला पुत्र लाडका माय बापाचा,
भोगतील शिक्षा जन्म भर आता
अपराध असा काय त्या दोहांचा?

© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९