आम्ही मुंबईकर..

Started by vishal harel, November 29, 2015, 04:54:51 PM

Previous topic - Next topic

vishal harel

आम्ही मुंबईकर....
.
नाही कसली भिती आम्हाला, नाही कुणाच डर...
उराशी स्वप्न मोठी ठेउन गाठत असतो
काम आणि घर....
.
आम्ही मुंबईकर....
.
लोकलची गर्दी सतत असते अंगावर...
धावती स्वप्न नगरी आमची
मात करते प्रत्येक संकटावर...
.
मायानगरी जनु हि,
नाव तिच जगाच्या टोकावर....
.
आम्ही मुंबईकर....
.
राज्यकर्त्यांची आश्वासन मोठी असतात वर-वर...
पण आम्ही राहत नाही कोणाच्या भरोश्यावर...
.
होत असतात कधी कधी तंटा नी वाद..
पण इथुनच आधी पुढे येतो मदतीचा हात....

चाकरमाण्यांची होणारी सततची धावपळ....
जनु जोरदार पावसाची सर...
.
आम्ही मुंबईकर....
.
लाटांच्या बेटावर आमच घर..
जनु निळ्या आकाशात तरंगणार
एक राजमहल.....
.
आम्ही मुंबईकर....
आम्ही मुंबईकर....
आम्ही मुंबईकर....
............
लेखक- विशाल हरेल