गोजिरी

Started by shetye_pranav, November 29, 2015, 07:43:31 PM

Previous topic - Next topic

shetye_pranav

न सांगता ना बोलता,
मनातले हृदया न कळता,
आसवे तुझ्या डोळ्यातील पाहुनी,
मेघ बरसले न थांबता.

मन गुंतुनी गुंत्यात केसांच्या,
शब्द झाले तुझे संवेदना,
दवबिंदू तुझ्या खळीवर ओसरला,
मग जीव हा दुसऱ्याचा होईना,

पापण्या हळव्या चक्षु वरती,
सुंदर एक परी जणू,
डोळ्यात उतरून सारे काही,
स्वतःस मग मी काय म्हणू.

रुक्ष झाली सारी धरती,
तूच माझी सावली,
साथ तुझी असुदे सर्वदा,
लावण्य सुरेख तुझे गोजिरी...

प्रणव
७२०८५५०७७१

Pranali nar


Pranali nar

Khup chan...sundar...👌👌👌