पावसाची कैफीयत..

Started by sameer3971, December 01, 2015, 01:21:49 PM

Previous topic - Next topic

sameer3971

पावसाची कैफीयत.......


अरे अरे माणसा
बरसू तरी मी कसा?
जून गेला उलटून
लाज वाटते मला

स्रृष्टीचे नियम मोडून
तुम्ही लाच घेत होतात
मला भुलवणार्या मोरांची
शिकार करत होतात

रेनडान्स च्या डीजेवर
तुम्ही थीरकत होतात
पण् खुलवणाय्रा झाडांवर
कुह्राड चालवीत होतात

माझा तो थाट अन्
मेघांसवे चा थयथयाट
लोप पावलेत आता
कशाला पाहील
चातक ही वाट

माझ्या रीमझीम धारांनी
त्रृष्णा मनीची भागत होती
बिसलरीचे पाणी घेऊन
तहान कुठे तुला जलधारांची?

ढग काळे आणू कसा?
समुद्रच सारा गढूळलाय
धरणीची ह्रास तुम्ही केली
विजांसवे मी बरसू कसा?
सांग मला मी बरसू कसा?