असावे कूणी आपले.....

Started by sameer3971, December 01, 2015, 01:27:27 PM

Previous topic - Next topic

sameer3971

आपले असावे कुणी....
कुणाच्या कुशीत शिरून
हमसून हमसून रडायला.....
आपूलकीने जवळ घेऊन
पाठी वरून हात फीरवायला
असावे कूणी आपले.....

प्रेमाने त्याच्याशी बोलून
सल मनातले सांगायला....
सतत् काळजी घेऊन..
आपले अंतरंग ऊलघडायला....
असावे कूणी आपूले...

वयाने वाढलो मी....
मनाने वाढलो मी..
पत माझी उंच झाली...
पण पाय जमीनीवर ठेवायला..
असावे कूणी आपूले....

आयुष्य आहे ऊज्वल....
कशाचीच ना कमरतता...
मनीचे प्रश्ण माझे...
आपूलकीने सोडवाया
असावे कूणी आपूले