शब्द तुझे; प्राण माझे होते.

Started by sameer3971, December 01, 2015, 02:49:46 PM

Previous topic - Next topic

sameer3971

रीता रीता मी झालो
सखे तुझ्या अबोल्याने
कळलेच ना मला ते
शब्द तुझे; प्राण माझे होते.

ऊमगले जेव्हा मला ते
अंतर दूरचे होते,
तूझ्या गीतातले आता
थांबलेले सूर होते.

कालचे तूझे ते हासणे
अन् हासून ते लाजणे,
अनोळखी बघ झाले सारे
जे माझे जीवन होते.

येशील का गं परत
परत परत फीरून
डोळे बघना रीते झाले
सखे तुझ्या अबोल्याने

सांग ना मला सखे
बोल ना गं तू सखे
अंतरंगी ठेऊ मी कसे
सल तूझ्या दूराव्याचे

सोडून देह माझा
सांडून श्वास माझा
अशी कशी तू चालली
एकटीच .....
परतीच्या प्रवासाला