कधी वाटते

Started by sameer3971, December 01, 2015, 02:51:45 PM

Previous topic - Next topic

sameer3971

कधी वाटते नदी काठची
वाळू व्हावे.
खूशाल फेसाळत्या पाण्यात
न्हाऊन घ्यावे..
कधी वाटते वाहत्या धारेतून
अथांग पोहावे
खोलखोल डोहातून वरखाली
घूसळून यावे
कधी वाटते कीनारा धरून
गूजगोष्टी करा
हळूच जला जलातूनी
मीसळून जावे
कधी वाटते वाहत जाऊन
सागरास मीळावे
लाटालाटांनी खळखळून
कीनार्यावर झेपावे
जगणे असेच वाटण्याचे
असते, नसते
कधी ऊन तर कधी
पावसाळी असते
कधी लाटेवर आरूढ
व्हायचे असते
कधी कीनारावर शांत
विसावयाचे असते
कधी शोध खोल स्वत्वाचा
असतो तर
कधी रोष ऊथळ स्वप्नांचा
असतो