तुझा पाऊस....

Started by Nitin Bagde, December 01, 2015, 09:00:13 PM

Previous topic - Next topic

Nitin Bagde

                  - तुझा पाऊस....-


बाहेर पाऊस पडतोय,
पण,
मन मात्र तुझ्या प्रेमाचा अंकुर धरतोय..


पाऊसाने अंग ओल होतय,
पण,
मन मात्र तुझ्या आठवणीने चिंब होतय..


पाऊसाचा ओलावा खुप जानवतोय,
पण,
मनाला गारवा मात्र तुझ्या आठवणीचा आहे..


पाऊसाचे थेंब अंगाला स्पर्श करतात,
पण,
मनाला मात्र तुझाच स्पर्श होतोय..


पाऊसाने ओल्या मातीचा सुगंध उठलाय,
पण,
मनाला हेलावणारा तुझाच सुगंध...


पाऊसाचे ठिक-ठिकानी पाणी भरले आहे,
पण.
मन मात्र तुझ्याच आठवणीने गच्च भरले आहे..


पाऊसाचा आवाज कान भरून काढतो,
पण,
तुझ्या आवाजाने मन मात्र तृप्त होते..


पाऊस हवा नाही तरी येतो,
पण,
तू हवी आहेस मात्र येत नाहीस...


तुझ्या पेक्षा आता पाऊसच बरा वाटतो आहे,
पण,
पाऊस आला की तुझी आठवण घेवून येतो..


पाऊस दर वेळी येतो...
पण,
तू एक वेळ तरी येशील का ?


"सांग ना...
             या वेड्या मनाला..."

                           
                                    -मनस्पंदन..
                                       -नितिन..