मन माझा सांगतो

Started by सागर बिसेन, December 02, 2015, 07:09:53 AM

Previous topic - Next topic

सागर बिसेन

              ***मन माझा सांगतो ***

शोधात तिच्या आता प्रत्येक क्षण कसा माझा लांबतो।
सापडेल कधीतरी ती तुला, मन प्रत्येकवेळी माझा मला सांगतो।।

धुंदीत आपल्याच मी नुसता इकडून तिकडे स्वैर फिरतो।
प्रवास शोधाचा हा तिचा अजूनच मला पुढे पुढे सारतो।।

स्वप्नच आता जणू झाले जगणे, त्या स्वप्नातच मी चालतो।
ऐकलेला प्रत्येक शब्द कानी तिचा आता अजून जवळून बोलतो।।

आनंद मनी भासे त्या खुशाल रूपाची कृती पुन्हा मी पाहतो।
क्षण आपला आता फक्त आठवणींत तिच्याच  घालवतो।।

रात्र हि आता निजू न देई, मनातच तिला आठवून हसतो।
हुंदका आठवणींचा हृदयी बसता नुसताच रडत असतो।।

सापडेल कधीतरी ती तुला,मन प्रत्येकवेळी माझा मला सांगतो।
शोधात तिच्या आता प्रत्येक क्षण कसा माझा लांबतो।।

:- सागर सा. बिसेन
9403824566
जिल्हा. गोंदिया