अशीच येउन जाते

Started by शिवाजी सांगळे, December 02, 2015, 11:37:28 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

अशीच येउन जाते

ती अशीच येउन जाते
स्वप्नात झुलवत राहते,
रेंगाळते दिवसभर ती
फिरूनी स्वप्नातच येते !

प्रत्यक्षात कधी यावी
मोनोमनी असे वाटते,
खेळ माझ्याच मनाचे
भासात तीच्या गुंतवते !

मज स्वप्नीच्या परी तू
चुंबता माझ्या हाता ते,
होऊन गंध तो नशीला
जगणेच मोहरून जाते !

चांदण्या प्रकाशी मंद
न्हाउन रात्र ती जाते,
तारकेत हर एक मग
प्रतिमा तुझीच दिसते !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९