==* ये अशी सामोर तू *==

Started by SHASHIKANT SHANDILE, December 03, 2015, 11:09:40 AM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

ये अशी सामोर तू का लाजते मजला प्रिये
धीर दे आतुर मना का छेडते मजला प्रिये
ये अशी सामोर तू ................

बघुनी तुला मी भान हरविलो
ओढ तुझी मज लागली
स्वप्न बघितले तुज संगतीचे
कसली आस हि जागली

जगवेना गं दूर तुझ्या का पडते तू दूर प्रिये
ये अशी सामोर तू ................

मांडाया संसार तुजसवे
साथ मला तू दे जरा
तुझी सोबती घेऊन सजनी
जीवन माझे फुलू दे जरा

बघ करुनी प्रेम जरा का घाबरते मजला प्रिये
ये अशी सामोर तू ...............

----------------------
शशिकांत शांडीले (SD), नागपूर
भ्रमणध्वनी - ९९७५९९५४५०
दि. ०३/१२/२०१५
Its Just My Word's

शब्द माझे!