निखळ मैत्री

Started by swara, December 03, 2015, 04:12:46 PM

Previous topic - Next topic

swara

१ निखळ मैत्री

     कोरम mall मध्ये भेटायचं ठरलं. मी आणि माझे friends सगळे mall मध्ये भेटलो .... आलो तसेच काय खायचं हे decide करू  लागलो.  शेवटी donuts खायचं ठरलं, जवळ जवळ सगळ्या प्रकारचे  donuts ओर्डर केले. एकेका donut साठी हवरयासारख भांडत  होतो. त्यात एका donut मध्ये gems च्या गोळ्या... हे दोघ हावरे असताना आम्हाला काही खायला मिळेल तर शपथ.... खूप राग आलेला त्यावेळी... mall मध्ये सुद्धा , आजूबाजूला न बघता आमचा हवरेपणा चालूच होता. :D
     त्या दिवशी खूप मुसळधार पाउस होता. . निघायची वेळ झाली तरी पाउस तसाच कोसळत होता. आता अजून आम्ही थांबायचा प्रश्नच नव्हता कारण आधीच घड्याळात रात्रीचे  ९ वाजलेले. घरी आपली मस्त पूजा होणार हे  माहित होत. आज त्याच्याकडे पण raincoat नव्हता. मग काय...  दोघही थंडीने कुडकुडत जायचं ठरलं. मी तरीही माझ स्कार्फ चेहऱ्यावर गुंडाळल , त्याच्याकडे हेल्मेट होत. मुसळधार पावसात माझ स्कार्फ  संपूर्ण भिजलेल. खूप थंडी वाजत होती पण  दोघ पण शांतच होतो. बाइक वरून जाताना थंडीने  त-त प-प होत होत. पण काय बोलायचं हे कदाचित दोघांना कळत नव्हत, म्हणून ठाणे ते घाटकोपर असेच ... घोर शांततेत मौन व्रत पाळल्यासारख आलो .  तो  नेहमी मला माझ्या घरापर्यंत सोडायचा. ;) रात्री उशीर झाल्यामुळे घरी lights off होत्या म्हणून मी संपूर्ण भिजलीय हे कोणाच्या लक्षात नाही आल .... आई थोड्यावेळाने उठली. आणि खूप मोठी पूजा केली माझी.... :D . पण ठीक आहे. आपल्या मैत्री साठी इतक तर ऐकू शकतेच ना  ...... :p