ध्यास

Started by swaraj, December 03, 2015, 05:56:10 PM

Previous topic - Next topic

swaraj

                                                                        ध्यास
तू नसतोस पण का असतोस
माझ्या बरोबर जसा श्वास
का ? असतो या डोळ्याना तुझाच ध्यास ........

डोळ्यांमध्ये तू राहतो प्रिय जसा
ओठांवर तू असतोस शब्द जसा
आहेस हृदयात तू स्वामी जसा
असतोस तू माझ्यामध्ये मी जसा

कानामध्ये तू बोलतो  वारा जसा
गालात हसतोस मोहक चंद्र जसा
स्पर्श आहे तुझा तुशारांसारखा मृदू जसा

तू नसतोस पण असतोस
माझ्या बरोबर जसा श्वास
आणि असतो डोळ्यांना तुझाच ध्यास 


Swati Gaidhani(swaraj)
Swati Gaidhani (swaraj )