उपाधी

Started by विक्रांत, December 03, 2015, 06:52:56 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

कैसा अधिकार कसलीही सत्ता |
देवा तुझ्या हाता दोर माझी ||
चुकुनिया आला हातात अंकुश |
नको नको त्यास ठेवू हाती   ||
करू नको मना व्यर्थ यातायात |
प्रभू स्मरणात आडकाठी ||
कशाला उपाधी आता दत्तनाथा |
होई मी वाहता कासावीस ||
करुनी भणंग देई अपमान |
अहंता पुसून टाक माझी  ||
तुझिया प्रेमाचा देवूनी प्रसाद |
जाहले प्रमाद घाली पोटी ||
आणिक न उठो मनात एषना |
संगती सज्जना घडो यावी ||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/