मोह ...

Started by विक्रांत, December 03, 2015, 07:01:42 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

एक जुनाट सत्य माझ्या
उरामध्ये जळत होते
आणि लोक तरीही मज
उकीरडी लोटत होते

खांद्यावर वाहिलेले ते
तसे ओझे खोटेच होते
कसे न कळे पण देहाचा
कण कण ठणकत होते 

तसा लोभ सिंहासनाचा
नव्हता मला कधीच रे
सुळासाठी सोन्याच्या ते
नि मला पटवीत होते 

बुद्ध्याची जातोय वाटेनी   
जिथे न जाते कधी कुणी
अवेळी मजसाठी तिथे
कुणीतरी ते गात होते

हा काळ पाकळ्यांचा सदा
हळू हळू ओघळणार
कोमेजले अमरत्व का
कुणी कुणा मागत होते

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/