मी ज्योतीराव बोलतोय

Started by Akshay S Mahajan, December 03, 2015, 07:44:49 PM

Previous topic - Next topic

Akshay S Mahajan

            "मी ज्योतीराव बोलतोय"

जग म्हणत मी माळ्यांचा ,
मात्र मी तर आहे संपुर्ण जगाचा .
म्हणतात आदराने महात्मा मला ,   
शेवटी शिक्षणापुढे धार्मिक शक्तिही हरल्या
सर्व शिक्षकांमध्ये मी मात्र मला शोधतोय,
मी तर आपलाच ज्योतीराव बोलतोय.

सावित्रींनी दिली मला जीवनभराची साथ,
शिक्षणाच्या कार्यात दिला मदतीचा हाथ.
स्वतः शिकून नंतर सावित्रींनी जगाला केले साक्षर,
मी आणि सावित्री झाले महाराष्ट्राचे पहिले हेडमास्टर.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये मी मात्र मला शोधतोय,
मी तर आपलाच ज्योतीराव बोलतोय.

शिक्षणाने होते कुठे नेकी तर कुठे होते ऐकी,
आजही जगात नाव कमवताय सावित्री च्या लेकी.
सर्व शिक्षक चालवताय माझा शैक्षिणक वसा,
विद्यार्थी त्यांच शिकुन उमटवतील वेगळाच ठसा.
विद्यार्थ्यांच्या भविष्यात मी मात्र मला मला शोधतोय,
मी तर आपलाच ज्योतीराव बोलतोय.

बघतोय मी आजच्या शिक्षणाचा बाजार,
खरचं लागलाय का हो त्या शिक्षणाला आजार ?
मी तर तुम्हाला दिल होत अगदी शुद्ध शिक्षण,
शेवटी तुम्हीच करा आता त्याचे रक्षण.
मी मात्र माझा यशवंत आपल्यात शोधतोय,
मी तर आपलाच ज्योतीराव बोलतोय.

                         
                        - अक्षय संतोष महाजन.
                           मो़नं ८९८३१५९२८३