मैत्री

Started by Akshay S Mahajan, December 03, 2015, 07:47:47 PM

Previous topic - Next topic

Akshay S Mahajan

       मैत्री


असते ज्यात खात्री,
नसते ज्यात कात्री.
मात्र असते काहीतरी,
असा एक शब्द म्हणजे "मैत्री".

शत्रुंविरुद्धचे एक शस्त्र,
हजारो शब्दांच एक पत्र.
हजारो दिवसांच एक सत्र,
म्हणजे आपला एक मित्र.

मित्रांसोबतचे घालविलेले अनमोल क्षण,
नेहमीच येते त्यांची आठवण.
ह्रदया त्यांची केलेली असते साठवण,
असते जीवनातील एक महत्त्वाचे प्रकरण.

जुन्या मित्रांची आठवण येते सतत,
तर नव्या मित्रांशी होते सलगी नकळत .
आलीच आठवण कधीतरी हसत ,
तर भेटुत कधीतरी "कट्ट्यावर" परत.


               -Akshay S Mahajan
               मो़नं ८९८३१५९२८३