अंधश्रद्धा

Started by Akshay S Mahajan, December 03, 2015, 07:59:00 PM

Previous topic - Next topic

Akshay S Mahajan

 अंधश्रध्दा


आहे भारत देश आधुनिक,
त्यातील लोक आहेत प्रामाणिक.
मात्र काही वापरतात अंधश्रध्देचा मार्ग चुकीचा,
नंतर नियतिच करते त्यांचा खेळ बाकीचा.


कुणी घालते बचावासाठी काळेदोरे,
मात्र यामागे असतात काही वेगळेच धागेदोरे
कुणाला होते नजर तर कुणाला होते बाधा,
मात्र हा असतो मानसिकतेचा खेळ साधा.


अंधश्रध्दा दुर करणे होते एक स्वप्न,
दाभोळकरांनी केले त्यासाठी प्रयत्न.
भुत,प्रेत, काळाजादु 'बाबा' आणतात समोर,
मात्र शासनांच्या नियमांपुढे हे सगळेच असतात चोर .


गुप्तधन शोधण्यासाठी शॉर्टकट शोधतात,
गंडवल्यानंतर मात्र गुपचुप बसतात.
सगळी सुरक्षा एका काळ्या दोरयावर सोपवतात,
कोणतेही कार्य करण्यापूर्वी एक लिंबू मात्र टांगतात.

                         - अक्षय सं महाजन

                           मो़नं ८९८३१५९२८३