शिक्षक

Started by Akshay S Mahajan, December 03, 2015, 08:02:37 PM

Previous topic - Next topic

Akshay S Mahajan

        "शिक्षक"


ज्यांचे असते शिक्षण देण्याचे कार्य,
करतात ते नेहमी विद्यार्थ्यांना सहकार्य.
जे असतात शैक्षणिक लोकहिताचे रक्षक,
ते असतात सर्वांचे सन्माननीय शिक्षक.


कोणी म्हणते गुरूजी, तर कोणी म्हणते मास्तर,
नेहमीच असतो त्यांचा ज्ञानावर भर.
नेहमीच असते त्यांच विद्यार्थांवर लक्ष,
विद्यार्थी असतात त्यांच्या तासाला दक्ष.


देऊन विद्यार्थांना शुध्द शिक्षण,
करतात ते नव्या पिढीचे रक्षण.
जो असतो विषय किचकट ,
त्याच्यात बनवतात शिक्षक आपल्याला  बळकट.


कुणी असतात कडक, तर कुणी असतात प्रेमळ ,
मात्र त्यामागचा चेहरा नेहमीच असतो निर्मळ.
जर होईल चांगल्या शिक्षणाची निर्मिती,
तरच होईल भक्कम भारताची प्रगती.
               
                          -अक्षय सं महाजन
                           मो़नं ८९८३१५९२८३