शेवटची मिठी....

Started by Nitin Bagde, December 04, 2015, 12:43:11 PM

Previous topic - Next topic

Nitin Bagde

डोळ्यात फक्त अश्रू उरलय आता,
हस्य गेल कुठे काहीच कळेना,
भरभरल्या माझ्या ओंजळीत,
सुख काहीच का उरेना...

काय केला असा गुन्हा की,
ही वेदना सहावी लागली...
प्रेम केल फक्त तरी,
भुक का नाही भागली...

प्रेमात निघनारे अश्रू देखील,
हस्य समजून गिळत राहीलो....
दुखाचे ते घाव मनावर,
निअर्थच सोसत राहीलो....

तू दिल्यास वेदना,
मी त्यात प्रेम शोधल...
ह्रदय मला रोकत होत,
बघ मी तुझ्यासाठी त्यालाच रोकल...

एकाच शब्दात तू मला,
घातल्यास तरी किती अटी....
सर्व काही विसरायला लावलस,
पण आठवणीत राहीली ती फक्त,
तुझी शेवटची मिठी....

                                     मनस्पंदन...
                                        नितिन...

Shubham Vhaval

दर्दी कविता आहे मित्रा रडवलंस यार तू...

ज्योती सूर्यवंशी

मनाला स्पर्श करून गेली... खूपच छान !!!