प्रेम

Started by Vikas Vilas Deo, December 04, 2015, 01:16:34 PM

Previous topic - Next topic

Vikas Vilas Deo

प्रेम म्हणजे जगण्याचा आधार
सर्व सुखाचे सार

प्रेम म्हणजे गवताच नाजूक पातं
ह्रदयाला ह्रदयाशी जोडणार विश्वासाच नातं

प्रेम म्हणजे  जीवनासाठीचा श्वास
एकमेकांचा क्षणभर पुरेसा सहवास

प्रेम म्हणजे खडकाळ माळावर फुललेले फुल
परमेश्वराला पडलेली भूल

प्रेम म्हणजे  ह्रदयाला ह्रदयाशी जोडणारा सेतू
अन् प्रेम म्हणजे मी आणि तू

Poonam chand varma

@ Poonamchand V