नका विचारू आसवांच, इथे दुखावल्य मन ही, ------------अमित जयवंत गायकर

Started by AMIT GAIKAR, December 04, 2015, 05:04:36 PM

Previous topic - Next topic

AMIT GAIKAR

नका विचारू आसवांच,
इथे दुखावल्य मन ही,
जरा दिलं नाही लक्ष्य,
तर मोडतं हृदय ही !

अपघात ह्या वळणावर,
होतात वेळोवेळी,
नजर चुकवून,
तोडून जातो कुणीतरी हृदय ही,
नका विचारू आसवांच,
इथे दुखावल्य मन ही,
जरा दिलं नाही लक्ष्य,
तर मोडतं हृदय ही  !!

मोडून बसलो हृदय जरी,
चंचल हे मन अजूनही,
तुला विसरण्याचा अट्टाहास धरुनी,
आठवितो तुला आज ही,
नका विचारू आसवांच,
इथे दुखावल्य मन ही,
जरा दिलं नाही लक्ष्य,
तर मोडतं हृदय ही  !!!

रे मना,
जाऊ दे आहे वेळ अजून ही,
का हे डीवचनं स्वतःला,
का ही वेदना आज ही,
झुरत आहेस एका मोहा पाई,
नको विचारूस आता काही,
बिखरून गेलोय पुरता मी ही,

नका विचारू आसवांच,
इथे दुखावल्य मन ही,
जरा दिलं नाही लक्ष्य,
तर मोडतं हृदय ही  !!!!

                                            -----------------अमित जयवंत गायकर