चार पक्षी

Started by विक्रांत, December 04, 2015, 08:27:39 PM

Previous topic - Next topic

विक्रांत



तशी माझी कहाणी
नवीन मुळीच नाही
चार पक्षी झाडावर
पण कुणाचेच नाही

क्वचित कुणा पहाटे
क्षणिक जाणीव होते
चिवचिवणारे झाड
तेव्हा मधुर वाटते

मग कोण कुठे जातो
कसे कधी पुन्हा येतो
कुणालाच ठाव नसे
आकाशाचे गाणे होतो


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/