तुझी आठवण जणू पाऊसच

Started by sukeshini0401, December 05, 2015, 12:38:44 AM

Previous topic - Next topic

sukeshini0401

तुझी आठवण जणू पाऊसच
जेव्हा जेव्हा येते मला
चिंब चिंब भिजवून जाते...

कधी ओठांवर हास्य तर
कधी डोळ्यात अश्रू होऊन तरळते...
तुझी आठवण जणू पाऊसच
जेव्हा जेव्हा येते मला
चिंब चिंब भिजवून जाते...

गार हवेची झुळूक स्पर्श देते
अन मग अपसुकच तुझे नाव
माझ्या ओठांवर येते   
तुझी आठवण जणू पाऊसच
जेव्हा जेव्हा येते मला
चिंब चिंब भिजवून जाते...

माझे उगीच रुसणे - भांडणे   
अन् तु मला मनवणे
मग पावसात खेचून
आपण एकत्र भिजणे
तुझी आठवण जणू पाऊसच
जेव्हा जेव्हा येते मला
चिंब चिंब भिजवून जाते...

आठवतो का तुला तो
ओला पाऊस गार हवा
आणि माझी घट्ट मिठी
पण आता फक्त दुरावा...
तुझी आठवण जणू पाऊसच
जेव्हा जेव्हा येते मला
चिंब चिंब भिजवून जाते...


असे वाटते धावतच तुझ्या
सवे यावे अन् मग 
तुझ्यात मिसळून तुच व्हावे
विसरून हे जग सारे           
फक्त आपण दोघेच रहावे...
तुझी आठवण जणू पाऊसच
जेव्हा जेव्हा येते मला
चिंब चिंब भिजवून जाते...     

                                          -सुकेशिनी...
                              Miss u Manish...



deepali Shilwant