आला आला पाऊस आला

Started by sukeshini0401, December 05, 2015, 12:46:08 AM

Previous topic - Next topic

sukeshini0401

आला आला पाऊस आला
रिमझिम रिमझिम करीत
चोहीकडे धुके पसरले
धुंद झाले आसमंत...

आला आला पाऊस आला                       
गार गार हवा घेऊन
सरी वर सरी कोसळल्या
जणू होऊन बेभान...

आला आला पाऊस आला
रस्ते डोंगर गेले भिजून
जणू निसर्ग सजला आहे
हिरवा गार शालू नेसून...

आला आला पाऊस आला
दरवळला मातीचा सुगंध
जणू काही तृप्त झाली
ही तहानलेली जमिन...

                              - सुकेशिनी...