सकाळी सकाळी तुझी आठवण आली . . .

Started by Poonam chand varma, December 05, 2015, 10:34:35 AM

Previous topic - Next topic

Poonam chand varma

सकाळी सकाळी तुझी आठवण आली,
तोच जुना विरह देवून गेली,

तेच जुन्या आठवणी डोळ्यासमोर आल्या,
परत हृदयात प्रेमाच्या भावना निर्माण झाल्या..

तेच तुझे स्मित हासणे  मला आठवले,
परत त्याच स्वप्नांचे आकाश गाठावले,

पण मनाची विचाराची थांबविली मी हद्द ,
नाही ती समोर तर का करतोस तू जिद्द

असले तुला प्रेम जरी समुद्र सारखे अपार ,
पण नसणार तुझ्यात ती तर काय करशील यार

आहेस ना तुझ्या , तिच्या सर्व आठवणी
तर मनातच का गात नाही तिच्या प्रेमाची तू गाणी...

मनातच हो  तू तिच्या प्रेमात वेडा 
मनातच कर तू तिचा स्पर्श थोडा...

@ Poonam V  :)
@ Poonamchand V



Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Pankajj Kumar Ujjainkar