" जिस्म " तर राहिले , पण " जान " गेली.....

Started by Poonam chand varma, December 05, 2015, 09:20:21 PM

Previous topic - Next topic

Poonam chand varma

अशी आहे माझी कहाणी , ती होती माझी दिवाणी
काही वर्षांचा तिचा सहवास , मग अनंत विराणी

मी होतो तिच्या मनात ,  आणि माझ विश्व  होत त्यात
तिच्या डोळ्यात होते प्रेम , आणि  माझ्या हातात तिचा हात

नांद्लो कित्येक वर्ष ,  बनून प्रेमाचे पाखरू
जगलो - झोपलो तिच्याच विचारात , जणू जसे लेकरू

दुखावरती  माझ्या , अश्रू तिला यायचे
सुखावरती तिच्या , हास्य माझे  खुलायाचे 

म्हणत होती  मित्र मंडळी  , " दो जिस्म एक जान "
आम्ही सुद्धा मानायचो, त्यांचे हे खोटे काहान

पण......

एक दिवस आला असा ,  श्वासाला तिच्या झाली इजा
एक अनोखी अपघाताने , जीवनाची तिच्या झाली रजा

आता फक्त मी आहे आणि,  तिच्या आठवणी या जगात
जगतोय मृत देहासारखा,   तिच्या दुखाच्या विरहात..

का " तो " क्षण , तिच्या आयुष्यात आला
आला " तो " तर मग  मला , का सोडून गेला

खोटी होती मित्र मंडळी , जे आसे म्हणारी
" जिस्म " तर राहिले , पण " जान " गेली.....

@ Poonam V
@ Poonamchand V