*** विश्वरत्न माझा हरपला ***

Started by धनराज होवाळ, December 06, 2015, 07:17:20 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


🙏🏻🔵 विश्वरत्न माझा हरपला 🔵🙏🏻

आई माझी रमाई,
बाप माझा भिमा..
भिमसैनिकाची गोष्ट,
मी सांगतोय तुम्हा..!!

दलितांचा तो राजा,
हा विश्वरत्न माझा..
प्रत्येकाच्या हृदयात,
हा भिमराव माझा..!!

त्या चवदार तळ्याची,
मिठास त्याने चाखली..
मग दृष्ट ब्राह्मंणांची मान,
बाबासाहेबांपुढे वाकली..!!

अरे शुद्र लोकांनाही त्याने,
बेधडक जगणं शिकवलं..
त्यांची अस्पुर्शता काढून,
जणु स्वर्गात त्यांना घडवलं..!!

जिथे दलितांना शिक्षण नव्हतं,
बाबांनी मुलींना ही शिकवलं..
माझ्या आई-बापामुळे जणु,
गरीबाघरी अमृतच पिकवलं..!!

आज अभिमानाने जगतोय,
कारण बाबांची पुण्याई आहे..
एकदा "जय भिम" बोलण्यात पण,
पदरात बाबांची कमाई आहे..!!

अरे महापुरुष तो माझा,
जो दलितांसाठी झिरपला...
पसरली जगात शोककळा,
तो विश्वरत्न माझा हरपला...!!!

"भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार", महामानव बोधीसत्व परमपुज्य क्रांतीसुर्य विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त विनम्र अभिवादन..
💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻

💙 जय भिम 💙
-
स्वलिखित...
👼🏼 धनराज होवाळ 👼🏼
मो. ९९७०६७९९४९
💙🙏🏻💙🙏🏻💙🙏🏻💙🙏🏻