तु दिसतोस...

Started by sukeshini0401, December 06, 2015, 05:10:18 PM

Previous topic - Next topic

sukeshini0401

कधी  स्वप्नांच्या डोहात तर
कधी आठवणींच्या सरोवरात
तु दिसतोस...

कधी प्रेमाच्या उन्हात
कधी मायेच्या सावलीत
तु दिसतोस...

कधी आनंदाच्या बागेत तर
कधी उदासीच्या वणव्यात
तु दिसतोस...

कधी माझ्या डोळ्यात तर
कधी माझ्या ह्रदयात
तु दिसतोस...

तुझे असणे तुझे दिसणे
तुझेच भास अहोरात्र
तुझे अस्तित्व नेहमी,
माझ्यातच सवत्र...
                                   सुकेशिनी...
                  MISS YOU MANISH....