मी तुझ्यात गुंतत गेले

Started by kulkarni24, December 06, 2015, 08:13:43 PM

Previous topic - Next topic

kulkarni24

का कुणास ठाऊक मी तुझ्यात गुंतत गेले
तुझ्या मनात नसूनही सतत तुलाच चिंतत गेले

का कुणास ठाऊक खोट्या आशेवर जगत गेले
सगळे भ्रम तुटल्यावरही दिवास्वप्न पाहत गेले

एकाच त्या क्षणावर आयुष्य निघून जाईल
तुझ्या आठवणी मन  हळवे करून जाईल

काही वाटत नाही तुझ्या आठवणीत उशी भिजवताना
मला तर पहायचे आहे तुला पुन्हा माझ्यासाठी हसताना

नकळत तुझ्या तुझ्यावर प्रेम करत राहिले खरे
तुला कळण्याआधी गोड आठवणीत हे नाते संपलेलाच बरे....


                                                       ईशा कुलकर्णी