शहर

Started by kulkarni24, December 06, 2015, 08:48:48 PM

Previous topic - Next topic

kulkarni24

ते शहर पहिल्यांदा पाहिले तुला...
ते शहर जिथे विसरले तुझ्यामुळे स्वतःला...

वाटले का पडले प्रेमात त्या शहराच्या...
उमगले नंतर गाठी रुजल्या आहेत तिथे आपल्या ऋणानुबंधाच्या...

कधी सांगू कसा केला होता परिस्थितीने घात...
जेंव्हा सोडून द्यावी लागली त्या शहराची साथ...

आता परत येउन पुन्हा मन झाले आए आतुर...
माजवले आहे त्यात तुझ्याच आठवणीने काहूर....

पुन्हा घेत आहोत एकाच हवेत श्वास....
मनाला लागली पुन्हा तुला बघण्याची आस...


ईशा कुलकर्णी