दिखावा

Started by kulkarni24, December 06, 2015, 09:02:04 PM

Previous topic - Next topic

kulkarni24

अजूनही आठवतो माझ्या हाती घट्ट धरलेला तुझा हात...
कळलेच नाही कशी सरली तुझ्या डोळ्यात ती चांदरात...

चूक आहे तुझी, तुझ्याविना जगण्याची सवय तू मोडलीस...
बावरलेल्या पक्षाला घरट्याची आस तू दाखवलीस...

अपेक्षांचे ओझे घेऊन चालले तुझ्या वाटेने...
ठेच लागता पाहिले तुझ्याचकडे आशेने...

मृगजळ भासे आपल्या नात्यातला ओलावा...
आता काहीच उरले नाही उरला फक्त दिखावा ...


ईशा कुलकर्णी