माझ्यासारखे कधी तुही जागून बघ

Started by kulkarni24, December 06, 2015, 09:59:15 PM

Previous topic - Next topic

kulkarni24

कोवळ्या प्रेमाचा गंध घेऊन बघ
माझ्यासारखे कधी तुही जागून बघ

न झोपता अंथरुणात कूस बदलत रात्र काढून बघ
माझ्यासारखे कधी तुही जागून बघ

तू समोर असूनही माझ्याबरोबर  नसलेल्याची खंत सोसून बघ
माझ्यासारखे कधी तुही जागून बघ

आक्रोश मनात असूनही शांततेचा आव आणून बघ
माझ्यासारखे कधी तुही जागून बघ

गर्दीतही सलणारे एकटेपण अनुभवून बघ
माझ्यासारखे कधी तुही जागून बघ

भान हरपून माझ्या डोळ्यात स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करून बघ
माझ्यासारखे कधी तुही जागून बघ

माझ्या डोळ्यांनी कधीतरी स्वतःला बघ
माझ्यासारखे कधी तुही मरून बघ


ईशा कुलकर्णी